सोलापूर : प्रभाग 26 मधील द्वारका नगर येथे हद्दवाढ झाल्यापासून कुठल्याच सुविधा नव्हत्या त्याबाबत तेथील नागरिक हे सातत्याने नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदने दिली होती. त्याची दखल घेऊन निधी उपलब्ध करून देत. ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी तेथील नागरिकांनी सांगितले की आम्ही गेले ३० ते ३५ वर्षांपासून राहतो परंतु फक्त निवडणुका आल्या की मतदानासाठी यायचे निवडून गेल्यानंतर परत नगरात फिरकत नव्हते. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रत्यक्ष कामाची सुरुवात करून दिली त्याबद्दल तेथील नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा खारे, सदर नगरातील जावेद गडवाले, दीपाली शिवणकर, वर्षा मारडेकर, संगीता कोळी राऊत ,मेहत्रे ,उडानशिव , पाटील , देशमुख , टिळे आदी सह नगरातील महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक.मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.