• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समकालीनता हे साहित्याचं मूल्य – स्वामी गोविंददेव गिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2021
in इतर घडामोडी
0
समकालीनता हे साहित्याचं मूल्य – स्वामी गोविंददेव गिरी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : समकालीनता हे उच्चप्रतीच्या साहित्याचे मूल्य असते. असे समकालीन साहित्य लिहिण्याची प्रेरणा साहित्यिकांनी घ्यावी, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी मंगळवारी १२ जानेवारीला पुण्यात केले. चपराक प्रकाशनाच्या वतीने आयोजित साहित्य मेळाव्यात राज्यभरातील १५ लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात सोलापूरचे साहित्यिक आणि आकाशवाणी सोलापूरचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांच्या ‘शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर’ या कविता आणि गाण्यांच्या रसग्रहणात्मक लेखसंग्रहाचं प्रकाशन झालं.

आपल्या भाषणात गोविंददेव गिरी यांनी प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या धाडसी लेखणी, वाणी आणि प्रकाशनाचा गौरवाने उल्लेख केला. ते म्हणाले, “सध्याच्या काळात गुळमुळीत राहून चालणार नाही. देशविघातक शक्ती उघडउघड काम करत असताना आणि त्यासाठी विकले गेलेले लेखक विकृत लेखन करत असताना कुणीतरी धाडसाने पुढे येऊन ‘चपराक’ लावणे गरजेचे असते. देशविरोधी प्रवृत्तींविरुध्द प्रतिकार करण्यासाठी साहित्यिकांच्या प्रज्ञेला धार आली पाहिजे. अशा जीवनसन्मुख साहित्यातूनच उन्नत समाजाची निर्मिती होत असते.

साहित्यात संस्कृती घडविण्याची शक्ती असते असे मत प्रदीप रावत यांनी यावेळी व्यक्त केले. व्यापक, सखोल आणि समृध्द जीवनानुभव साहित्यात प्रतिबिंबित व्हावा असंही ते म्हणाले. प्रारंभी घनश्याम पाटील यांनी प्रस्ताविक भाषणात चपराक प्रकाशनाच्या वाटचालीची माहिती देऊन कोरोनाकाळातही वाचनसंस्कृती संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुनील शिनखेडे यांनी ‘शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकनिर्मितीमागची प्रेरणा स्पष्ट केली. चांगल्या कविता आणि अवीट गोडीची गाणी यांचा रसास्वाद रसिकांना घडावा यासाठी लिहिले आणि आनंद वाटून दिला असं ते म्हणाले. या पुस्तकाला कविवर्य ना. धों. महानोर यांची प्रस्तावना आहे. शिनखेडे यांनी हे पुस्तक ‘नव्वदी पार केलेल्या ऐश्वर्यवती आकाशवाणीला’ अर्पण केले आहे.
या कार्यक्रमाला सुधीर गाडगीळ, विजय जोशी, स्नेहा शिनखेडे, सुरेश खानापुरकर यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.
या चपराक साहित्य मेळाव्यात दुपारी विविध सत्रात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती, महादेवी स्वामी-मोरे यांचं गायन आणि निमंत्रितांचं कविसंमेलन हे कार्यक्रम पार पडले. रसिकांनी सर्वच कार्यक्रमांना दाद दिली.

Previous Post

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम – पालकमंत्री भरणे

Next Post

कोविडबाधित मतदारांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयुक्तांची माहिती

Related Posts

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
इतर घडामोडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
Next Post
कोविडबाधित मतदारांनाही  करता येणार मतदान; निवडणूक आयुक्तांची माहिती

कोविडबाधित मतदारांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयुक्तांची माहिती

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026