सोलापूर : स.क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूर आयोजित सामुदायिक व्रतबंध मुंज सोहळ्यात आज 160 हून अधिक बटूंचा उपनयन सोहळा उत्साहात,भक्तिमय वातावरणात,हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सहस्त्रार्जुन प्रशालेच्या प्रांगणात परमपूज्य जयश्री माताजी यांच्या दिव्य व मंगल सानिध्यात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सो.स.क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीवसा बिद्री हे होते.यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक अविनाश पाटील,नगरसेविका सौ.राजश्री कणके,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,प्रांतीय अध्यक्ष भगवान कुदळे, शंकर गुजराती, सहस्त्रार्जुन पतपेढीचे चेअरमन नारायण काटवे, प्रांतीय सचिव रमाकांत वाळवेकर, विजय कडतन, क्षत्रिय समाज सेवा मंडळाचे सचिव सुनील पवार, उद्योजक नित्यानंद दर्बी,परशुराम लोमटे,संस्थेचे सचिव जयकुमार कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व संस्थेचे सदस्य राजू भूमकर, भरतकुमार शालगर, सुरेश बिद्री,श्रीराम पवार,गणेश दामजी, शिरीष कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या आशीर्वाचन पर भाषणात जयश्री माताजी म्हणाल्या, समाजातील महिलांनी संघटित व्हावे,मुलांनी उच्च शिक्षण प्राप्त करावे. उच्च शिक्षणाबरोबर संस्कार आणि परंपरा जपावे.
यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, सो. स.क्षत्रिय समाजाने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.यामुळे गोरगरीब समाज बांधवांची सेवा घडते. वेळेची बचत होते आणि अनावश्यक खर्च टाळला जातो. समाज संघटित होण्यासाठी मदत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री म्हणाले, ट्रस्टच्यावतीने आयोजित या सोहळ्यास समाज बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि सहकार्यही केले.यापुढे देखील ट्रस्टच्यावतीने आयोजित उपक्रमास समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.मागील अकरा वर्षापासून ही सेवा चालू असून आतापर्यंत दोन हजाराहून अधिक कुटुंबानी याचा लाभ घेतला.
या सोहळ्यात 160 हून अधिक बटू महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेशातून आले होते. सहस्त्रार्जुन प्रशालेच्या प्रांगणात भव्य मांडव उभारण्यात आले होते.सात ते आठ हजार बांधवांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उपनयन सोहळ्याचे संस्कार दिगंबर जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कबाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सदस्य संजीव रंगरेज यांनी मानले.










