• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2026
in इतर घडामोडी
0
विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच उत्तम निवास व्यवस्था आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पंढरपूरमध्ये उच्च शिक्षणाच्या विविध संधी आणि शैक्षणिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. अण्णा बनसोडे यांनी केले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम विद्यालय येथील संत गाडगे महाराज-चोखामेळा विद्यार्थी वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील निवास व्यवस्था, शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अन्य सोयी-सुविधांची माहिती घेतली.

तसेच संस्थेच्या मालकीच्या कराड रोडवरील वखार महामंडळाशेजारील रिकाम्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. या जागेवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व निवासी सुविधांसाठी इमारतीचे बांधकाम करून आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूरमधील शैक्षणिक संस्थांच्या विकासासोबतच उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच उच्च शिक्षण अभ्यासक्रम , शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम पंढरपूरमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे पंढरपूर शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच विविध शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असेही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. संस्थेच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य सुनील सर्वगोड, सदस्य चंद्रशेखर कांबळे, गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कांबळे, वस्तीगृह अधिक्षक नंदकुमार वाघमारे तसेच गौतम विद्यालयाचे शिक्षक तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

Next Post

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Related Posts

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
Next Post
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

November 28, 2026
विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

November 28, 2026
डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

November 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026