सब हेड । दोन दिवसीय सक्षम अधिवेशनाचे झाले उदघाटन, अभिनेते अभिजित खांडकेकर यांचाही सहभाग
सोलापूर : दिव्यांगासाठी विशेष कायदा आहे तो आपल्या अवती भवती असणाऱ्या दिव्यांगाना समजावा या करीता त्यांना मदत करा. त्यांच्या लैंगिक शिक्षणाचाही अधिकार त्याची जाणीव त्यांना व्ह्ययला हवी याबाबतही त्यांना मदत करा. असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उदय वारुंजीकर यांनी केले.
द्वारकाधीश मंदिरातील उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर सक्षमचे प्रांत सचिव नरेंद्र बापट, प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर, प्रांताध्यक्ष ज्येष्ठविधीज्ञ मुरलीधर कचरे, डॉ. अविनाश वाचासुंदर, सुरेश पाटील, प्रांत उपाध्यक्ष श्रीधर बापट ,अण्णा विसपुते, माजी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे ते म्हणाले मेंटली रिटायर्ड असणाऱ्या मुलींचे गर्भाशय काढले जातात त्या संदर्भात कायदा अस्तित्वात आहे. जोवर आपण प्रश्न विचारत नाही तोवर उत्तर मिळत नाही असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. तर यावेळी अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी यावेळी अधिवेशनाचा भाग होता आले याचा आनंद व्यक्त केला. प्रत्येकाला आपली रेष मोठी करायची घाई असते मात्र जर आपल्या समाजात कुणी दिव्यांग असेल तर त्याला सर्वतोपरी मदत करा असे मत व्यक्त केले. यावेळी अमोल देशमुख, गहिनीनाथ नलावडे, आनंद मोरे यांच्या दिव्यांग असूनही विशेष भरारी घेणारे व्यक्ती म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी सक्षम सोलापूर जिल्हा पालक पंकज मिठभाकरे विशेष प्रशिक्षक अश्विनी अंधारे, अध्यक्ष नंदिनी मालगत्ते आदींनी परिश्रम घेतले.
प्रमुख पाहुण्यांचा केला विषेश मुलांनी सत्कार
या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सर्वांनाच आनंद देणारी एक गोष्ट घडली ती म्हणजे मंचावर बसलेले जे सर्व प्रमुख पाहुणे होते. त्या सर्वांचा सन्मान विशेष मुलांनी केला. आयोजकांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या सन्मानाचे सर्वानाच कौतुक वाटले अन त्यावेळी विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांना पाहायला मिळाले.
भाषांतराने फुलला अधिवेशनाचा अर्थ
या अधिवेशनाच्या प्रारंभापासून ते शेवट पर्यंत मुख्य मंचावर विशेष मुलांचे भाषांतर करणाऱ्या शिक्षिका उपस्थित होत्या. त्या आपल्या हातवाऱ्याने हावभावाने प्रमुख पाहुणे किंवा कार्यक्रमाचा क्रम आणि आता पूढे काय हा सगळा अर्थ विशेष सांकेतिक भाषेत विशेष मुले आणि पालक यांना समजावून सांगितला. त्या मुळे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम बहरला.












