• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 27, 2026
in इतर घडामोडी
0
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. अक्कलकोट रोडवरून रे नगरला जोडणाऱ्या १८ मीटर आणि २४ मीटर रुंदीच्या दोन्ही रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करावीत. तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५६ कोटी रुपयांचे बीजभांडवल आणि येथील उद्योगांना अनुदान मिळण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरसय्या आडम, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, लक्ष्मण देशमुख, म्हाडाचे आटकले, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड, एमजीपी चे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचे कंत्राटदार अंकुर पांडे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

दोन्ही जोडरस्त्यांची कामे तातडीने सुरू करा

रे नगरमधील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अक्कलकोट रोडवरून जोडणारे १८ मीटर आणि २४ मीटर रुंदीचे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करून नियोजित कालावधीत पूर्ण करावीत. पायाभूत सुविधांसाठी मंजूर ३५८ कोटी रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था आणि ड्रेनेजची कामे सुरू आहेत. याच आराखड्यात दोन्ही जोडरस्त्यांचा समावेश करून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

गृहकर्जाचे हप्ते भरण्याबाबत लाभार्थ्यांचे प्रबोधन करा

रे नगरच्या पहिल्या टप्प्यातील ७ हजार ४५६ लाभार्थी बँकेच्या गृहकर्जाचे हप्ते नियमित भरत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. या लाभार्थ्यांचे फेडरेशनने प्रबोधन करून कर्जाचे हप्ते नियमित भरण्यासाठी प्रयत्न करावेत. जे लाभार्थी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ आहेत, त्यांच्याबाबत नियमानुसार निर्णय घेऊन इतर पात्र लाभार्थ्यांना संधी देण्याबाबत विचार करावा. पहिल्या टप्प्यातील गृहकर्जाची परतफेड नियमित झाल्याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील गृहप्रकल्पासाठी बँका कर्ज मंजूर करण्यास सकारात्मक राहणार नाहीत. त्यामुळे फेडरेशनने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ८०० अर्ज बँकांकडे प्रलंबित असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

जानेवारी २०२७ पर्यंत शाळांची बांधकामे पूर्ण करा

रे नगरमध्ये मंजूर असलेल्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दोन शाळांची बांधकामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावीत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत रे नगरमध्ये वास्तव्यास आलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून शाळेत प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या ४० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. किमान दोन अंगणवाड्या तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

रे नगरसाठी तीन मार्गांवर सिटी बससेवा

रे नगरमधील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन ते रे नगर, जोडभावनी पेठ ते रे नगर आणि बसस्थानक ते रे नगर या तीन मार्गांवर सिटी बससेवा सुरू करण्यासाठी म्हाडा आणि महापालिकेने समन्वयाने कार्यवाही करावी. बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला गॅप फंडिंगचा खर्च म्हाडाने द्यावा. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गारमेंट उद्योगातून दहा हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट

रे नगरमधील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गारमेंट क्षेत्रातील तयार असलेल्या ३८ उद्योजकांचे उद्योग तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी. या उद्योगांना शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यापूर्वी प्रशिक्षण केंद्र सुरू करून महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. या माध्यमातून किमान दहा हजार रोजगार निर्माण होऊ शकतात. तसेच पापड उद्योग सुरू करण्यासाठीही तातडीने कार्यवाही करावी. जमिनीशी संबंधित प्रश्नांवरही लवकर निर्णय घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी

प्रारंभी रे नगर फेडरेशनचे अध्यक्ष नरसय्या आडम यांनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून २५६ कोटी रुपयांचे बीजभांडवल तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. येथील उद्योगांना उद्योग विभागाकडून अनुदान मिळावे, विडी कामगारांना शासन निर्णयानुसार किमान ३८५ रुपये मजुरी मिळावी आणि दुसऱ्या टप्प्यातील गृहप्रकल्पासाठी बँकांनी कर्ज देण्यास शासनाने हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अक्कलकोट रोडवरून रे नगरला जोडणारे १८ मीटर व २४ मीटरचे दोन्ही रस्ते तातडीने पूर्ण करावेत, शाळा व अंगणवाड्या सुरू कराव्यात, तसेच बीजभांडवल, उद्योगांना अनुदान आणि अन्य प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Previous Post

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

Next Post

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा
इतर घडामोडी

जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 26, 2026
Next Post
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा "विधीभूषण पुरस्कार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026