• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2026
in मुख्य बातमी
0
मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मुंबई व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणी नियोजनासंदर्भात बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले निर्देश व महत्त्वाचे मुद्दे :

✅ मुंबई महानगर प्रदेशासाठी 2051 पर्यंत आणि पुणे महानगर प्रदेशासाठी 2047 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या, नागरीकरण व उद्योगांची वाढती गरज लक्षात घेऊन एकात्मिक, कालबद्ध व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य दीर्घकालीन जलनियोजन तयार करावे.
✅ नवीन प्रकल्पांसोबत प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण, पर्जन्यजल संचयन आणि पर्यायी जलस्रोतांवर भर द्यावा.
✅ वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण, उद्योग व डेटा सेंटरच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करावा.
✅ पर्यायी जलस्रोतांचा शोध घेऊन प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवावा.
✅ राज्यात विशेषतः मुंबई व पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेले जलप्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
✅ प्रस्तावित प्रकल्पांसाठी वन व पर्यावरणविषयक मान्यता, भूसंपादन आणि पुनर्वसनाची कार्यवाही समांतरपणे करणे तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे
✅ महानगरपालिका व नगरपालिकांनी जललेखा परीक्षण करून पाण्याची आवक, वितरण आणि प्रत्यक्ष देयक आकारणी यांचा अचूक ताळमेळ ठेवावा.
✅ व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी स्मार्ट मीटरचा वापर वाढवून महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करावे.

पुणे महानगरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्धतेसाठी विविध उपायांवर भर

✅ पुणे महानगर प्रदेशाची सध्याची लोकसंख्या सुमारे 1.80 कोटी असून 2047 पर्यंत ती 4.12 कोटी होण्याचा अंदाज आहे. सध्या 36.90 TMC पाणी आरक्षण उपलब्ध असून मागणी 41.65 TMC आहे. 2047 पर्यंत पाण्याची एकूण मागणी सुमारे 100 TMC अर्थात 7816 दशलक्ष लिटर प्रतिदिन होण्याचा अंदाज आहे.
✅ सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया करून ते उद्योग, वीज प्रकल्प आणि डेटा सेंटरसारख्या मोठ्या ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे. दुय्यम प्रक्रिया केलेले पाणी सिंचनासाठी वापरून पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करावा.
✅ पाणीगळती व मीटरविना होणारा पाणीपुरवठा कमी करण्यासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना, स्मार्ट मीटर आणि जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी. या उपाययोजनांमधून सुमारे 350 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची बचत होऊ शकते.
✅ पुणे महानगर प्रदेशातील अतिरिक्त पाणी उपलब्धतेसाठी नवीन जलस्रोतांचा शोध घेण्याबरोबरच विद्यमान स्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करावा.
✅ मुळशी धरणातून सुमारे 8 TMC पाणी उपलब्ध करून जलवाहिनीद्वारे खडकवासला परिसरात आणण्याच्या पर्यायांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासावी.
✅ नदीखोरे जोडणी, अतिरिक्त जलस्रोत आणि भूजल पुनर्भरणाच्या उपायांचा दीर्घकालीन आराखड्यात समावेश करावा.
✅ पुणे महानगर प्रदेशातील पाणी मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य कोकणातील सावित्री नदी परिसरातील पाणी कुकडी, भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा आणि नीरा नदीखोऱ्यांकडे वळविण्याच्या नदीजोड पर्यायाचा विचार करावा.
✅ कोकण खोरे ते भीमा खोरे नदीजोड योजना हा पर्याय विचारात घेऊन त्याचा प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) तयार करावा.

उद्योग आणि डेटा केंद्रांच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव

✅ उद्योग व डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) पूर्ण मालकीची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा.
✅ या कंपनीमार्फत नियमित जलस्रोतांमधील पाणी तसेच महानगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतील प्रक्रिया केलेले पाणी घेऊन त्याचे वितरण करावे.
✅ उपलब्ध सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे संचालन व देखभाल आणि औद्योगिक पाणीपुरवठा यांची एकत्रित व्यवस्था उभारावी, यासाठी आवश्यक धोरणात्मक तरतुदींचा प्रस्ताव सादर करावा.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
मुख्य बातमी

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026
मुख्य बातमी

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्य बातमी

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!
मुख्य बातमी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

November 20, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!
मुख्य बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026