• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2026
in मुख्य बातमी
0
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे

कार्तिकी यात्रेतील भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधांची व्यवस्था केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक

नांदेड जिल्ह्यातील सुधाकर शिंदे दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड; एसटीचा वर्षभर मोफत प्रवास पास प्रदान

पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

कार्तिकी यात्रेच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सूचनांची तत्परतेने अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या कामाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी तत्परतेने आणि धडाडीने निर्णय घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.

कार्तिकी यात्रेत सुधाकर शिंदे दाम्पत्य मानाचे वारकरी-
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली.

शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमित वारी करत असून, त्यांना सुशील व प्रणव हे दोन मुलगे आणि गायत्री व संस्कृती या दोन मुली आहेत. श्री. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखालील वारकरी परंपरेशी जोडलेले हे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून माळकरी असून, शेती व्यवसाय सांभाळत भक्तिभावाने वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आहेत.

Previous Post

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

Related Posts

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन
मुख्य बातमी

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

November 21, 2026
मुख्य बातमी

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्य बातमी

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!
मुख्य बातमी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

November 20, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!
मुख्य बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

मुंबई-पुण्याच्या जलसमृद्धीसाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम; सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात रवाना

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026