सोलापूर : ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बुधवार पेठेतील वडियाराज चौक, महात्मा गांधी रोड, सोलापूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोलापूर येथे उभारण्यात आलेल्या वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे, सी.ए. सुशील बंदपट्टे, गौतम भांडकेर, भीमाशंकर बंदपट्टे, सुदर्शन महाराज धोत्रे तसेच संस्थेचे संस्थापक नितीन बंदपट्टे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाला उत्सव अध्यक्ष दत्तात्रय कल्लागुटगी यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते सचिन बंदपट्टे, समर्थ देवकर, रोहन कंदलगावकर, गणेश बंदपट्टे, विलास बंदपट्टे, राहुल करे, मनोज बंदपट्टे, शेखर कंदलगावकर, रघुनाथ कुलकर्णी, संतोष मुडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.













