• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2026
in इतर घडामोडी
0
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
0
SHARES
0
VIEWS

पहिली उचल ३ हजार रुपये जाहीर करणाऱ्या कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत येत्या सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र, या दरावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला.

साखर कारखानदारांनी साखर उद्योगाचे नुकसान केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी प्रलंबित असताना दुष्काळाचे कारण पुढे करून यंदा महिनाभर आधीच कारखाने सुरू करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू झाल्याने सुरुवातीला साखरेचा उतारा (रिकव्हरी) अवघा सहा टक्क्यांच्या आसपास होता. त्यामुळे शेतकरी आणि साखर उद्योगाचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला.

याशिवाय, जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी यंदा साखर प्रतिक्विंटल ४२०० ते ४३०० रुपये दराने विक्रीचे करार करून व्यापाऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेतल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.

ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत माघार नाही

सध्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, पहिली उचल समाधानकारक जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Related Posts

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!
इतर घडामोडी

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 8, 2026
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!

November 7, 2026
सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!
इतर घडामोडी

सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!

November 7, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026