सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. 26 ऑक्टोबर 2026 रोजी 165 गावे व 853 वाड्यांमधील 3 लाख 37 हजार 43 नागरिकांना व 98 हजार 959 पशुधनाला 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 44 विहिरी व 26 बोअर असे एकूण 70 जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड यांनी दिली.
तालुकानिहाय मंगळवेढा 42 गावे – 45 टँकर, सांगोला 28 गावे – 39 टँकर, अक्कलकोट 18 गावे – 13 टँकर, माढा 15 गावे – 19 टँकर, बार्शी 15 गावे – 4 टँकर, करमाळा 13 गावे – 10 टँकर, माळशिरस 11 गावे – 11 टँकर, उत्तर सोलापूर 9 गावे – 16 टँकर, दक्षिण सोलापूर 7 गावे – 10 टँकर, मोहोळ 7 गावे – 11 टँकर असून पंढरपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.








