पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना शिक्षक मतदार नोंदणीचा घोळ सोलापूर जिल्ह्यात उघड झाला आहे. शिक्षक नसताना बार्शी तालुक्यात ११ शिक्षकांनी बनावट कागदपत्रे देऊन आपली नावे शिक्षक मतदार संघात नोंदविली. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशानंतर या 11 शिक्षकांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला . त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एमजी गुरुकुल व ज्योतिबाची वाडी तालुका बार्शी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक असल्याची प्रमाणपत्रे या 11 बोगस शिक्षकांनी सादर केली होती. गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन भोसले, अक्षय चव्हाण, तुषार भोसले,स्वप्निल कापसे, रोहित कापसे, पृथ्वीराज कापसे, शुक्राचार्य बाबर,सुरज बाबर, सुदेश कापसे,अभिजीत डिसले,संतोषी धेंडे या 11 जणांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून शिक्षक मतदार यादीत नावे समाविष्ट केल्याचे सिद्ध झाले आहे.










