पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यालयाबद्दल रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या वतीने येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांना सन 2026- 27 चा रोटरी चेंज मेकर व्हाईस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योजक जयेश पटेल यांच्या हस्ते शिवस्मारक सभागृहात रविवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ नॉर्थ च्या अध्यक्ष आसावरी सराफ, प्रोजेक्ट हेड डॉक्टर सचिन कोठारी, रोटरी चे सचिव विष्णू रंगरेज, युथ डायरेक्टर डॉक्टर सचिन जन्मा, पवन अग्रवाल,दिनेश अग्रवाल, रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य च्या लब्दी शहा,भार्गव मोंढे, सुरभी देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी युवकांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न झाला. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल यांची तरुणांना सोलापुरातच उद्योग उभा करावे, जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळेल असे सांगितले.












