मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील सात लाख 56 हजार 804 शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्या खात्यावर येत्या तीन ते चार दिवसात पाच हजार प्रमाणे एकूण 378 कोटी 40 लाख वीस हजार रुपयेचे अनुदान डायरेक्ट जमा होणार आहे. वास्तविक पाहता श्रीमंत शेतकऱ्यांना हे अनुदान देऊ नये अशी मागणी असताना थेट सर्वांनाच पाच हजार रुपये मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात लाख 56 हजार आठशे चार हे शेतकरी ऍग्री स्टॅक नोंदणी कृत आहेत. 50% देखील पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिक पाया गेले असून रब्बी पिकाची शाश्वती नाही. जिल्ह्यातील आठ लाख 98 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके जळून खाक झाली आहेत. केंद्राच्या पथकाने नुकताच जिल्ह्याचा दौरा केला अध्याप केंद्राची कोणतीही मदत जाहीर झाली नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पाच हजार रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. दुष्काळाबाबत अद्यापही ठोस उपाययोजना नसल्याचे दिसून येते.










