सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात ऊसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर, इथेनॉलला प्रतिलिटर 70 रुपये दर आणि एमएसपीमध्ये 50 रुपयांची वाढ यांसह विविध मागण्या करण्यात आल्या.
आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जवळपास चार ते पाच तास महामार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने दोन्ही बाजूंना अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.












