दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सणांच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये,यासाठी पुणे हडपसर आणि खडकी स्थानकातून विविध मार्गांवर ट्रेन ऑन डिमांड विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .प्रशासनाने रेल्वेच्या 256 विशेष फेऱ्यांचे नियोजन केल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तर संपूर्ण देशभरात सुमारे 12,000 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.
या विशेष गाड्यांचे तिकीट तुम्ही IRCTC अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळच्या रेल्वे तिकीट खिडकीवरून बुक करू शकता। अनारक्षित डब्यांची तिकिटे ‘UTS’ ॲप किंवा स्टेशनवरील काउंटरवरून मिळतील.










