• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2026
in मुख्य बातमी
0
ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
0
SHARES
0
VIEWS

साखर कारखान्यांनी वर्षभरातील अपघातांची माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर करावी; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

सोलापूर – जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांच्या वर्षभरातील अपघातांची संपूर्ण माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड, प्रादेशिक सह आयुक्त साखर यांचे प्रतिनिधी तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साखर कारखान्यांनी कामगारांची योग्य नोंदणी करणे, निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कामगारांच्या मुलांसाठी शाळा, शिक्षण तसेच आवश्यक त्या इतर सुविधा उपलब्ध होतील, यासाठी संबंधित साखर कारखान्यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

प्रत्येक साखर कारखान्यावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे-
ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची नियमित तपासणी होण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्येक साखर कारखान्यावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी साखर कारखाने, संबंधित विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या आरोग्य, निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मुलांचे शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आणि साखर कारखान्यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

२७ अपघात प्रकरणे प्राप्त; १७ प्रस्ताव कागदपत्रांच्या पूर्ततेसह
समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अपघात अनुदान योजनेची माहिती दिली. जिल्ह्यातील एकूण ३८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांच्या अपघातासंदर्भातील माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर केली आहे. या अनुषंगाने एकूण २७ प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापैकी १७ प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. या परिपूर्ण प्रकरणांना नियमानुसार मंजुरी द्यावी, असे सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी बैठकीत सांगित
ले.

Previous Post

दक्षता समितीच्या सदस्यांची माहिती दर्शविणारे बोर्ड प्रत्येक पोलीस ठाण्यात लावावेत

Next Post

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

Related Posts

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
मुख्य बातमी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!
मुख्य बातमी

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

October 5, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…
मुख्य बातमी

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
Next Post
विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026