सोलापूर- श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये रुग्णालयाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री सत्यनारायण बोल्ली यांची प्रेसिडेंट पदावर निवड करण्यात आली.निवड झाल्यानंतर रामकृष्ण कोंड्याल व सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी नवनिर्वाचित प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.



यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोल्ली यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, व्हाईस चेअरमन रमेश विडप, व्हाईस चेअरमन राजेशम येमूल,संचालक डॉ. विजयकुमार आरकल, संचालिका डॉ.लता मीठाकोल, संचालक डॉ.सचिन बलदवा, संचालक अशोक आडम, संचालक श्रीनिवास कमटम, संचालक लक्ष्मीनारायण कुचन, संचालक सुरेश फलमारी, संचालक मनोहर अनलदास, संचालक पार्वतीय श्रीराम, संचालक इरेशम कोंपेल्ली संचालिका माधवी चिट्याल संचालक सुधाकर गुंडेली,संचालक आनंद चंदनशिवे, तज्ञ संचालक भारत मुळे, तज्ञ संचालक श्रीधर बोल्ली,सल्लागार श्रीनिवास गुंडेली प्रशासकीय अधिकारी स्वामी अकेन प्रभारी प्रशासकीय अधिकारी दुर्गादास येमुल आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्राने गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीत रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी नवनिर्वाचित प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून, आगामी काळातील विविध उपक्रम व नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. नवनिर्वाचित सत्यनारायण बोल्ली यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.











