• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2026
in इतर घडामोडी
0
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
0
SHARES
2
VIEWS

वापर परवाना नसला तरी पात्र प्रकरणांत मालमत्ता कर आकारणी करण्याचे निर्देश; फ्लॅटधारकांना दिलासा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नवीन मिळकतींचा शोध घेऊन त्यांची मालमत्ता कर आकारणी करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. अपार्टमेंटमधील फ्लॅट तसेच गाळ्यांच्या कर आकारणीसंदर्भात संबंधित कर निरीक्षक व वसुली लिपिक यांच्याशी चर्चा करून उद्दिष्ट व कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

आढाव्यात नवीन मिळकतींच्या सर्वेक्षण व कर आकारणीच्या कामात काही प्रकरणांमध्ये वापर परवाना उपलब्ध नसणे तसेच इतर कारणांमुळे कर आकारणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या मिळकती कर आकारणीच्या कक्षेत आणण्यासाठी महापालिकेने पुढीलप्रमाणे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

बांधकाम परवाना आहे, मात्र वापर परवाना नाही तर काय

ज्या मिळकतीला बांधकाम परवाना मिळालेला आहे; परंतु वापर परवाना घेतलेला नाही, अशा मिळकतीची मालमत्ता कर आकारणी करण्याबाबत आदेशात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित मिळकतीची आकारणी बांधकाम परवाना मिळाल्यापासून आदेशात नमूद केलेल्या ०१ वर्षाच्या कालावधीचा विचार करून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फ्लॅट खरेदी केला आहे, पण बिल्डरने कर आकारणी केलेली नाही तर

अपार्टमेंट इमारतीमध्ये वापर परवाना नसल्यामुळे बिल्डरने फ्लॅटची मालमत्ता कर आकारणी करून घेतलेली नसेल, तर संबंधित फ्लॅटची कर आकारणी प्रलंबित ठेवू नयये अशा परिस्थितीत फ्लॅट खरेदी केल्याची तारीख किंवा संबंधित फ्लॅटचे लाईट बिल घेतल्याची तारीख, यापैकी लागू होणाऱ्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी करून संबंधित व्यक्तीची नोंद भोगवटादार म्हणून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामुळे फ्लॅटधारकांनी आपला फ्लॅट वापरात असूनही केवळ वापर परवाना उपलब्ध नसल्यामुळे मालमत्ता कर आकारणी झालेली नाही, अशी परिस्थिती असल्यास संबंधित कागदपत्रांसह महानगरपालिकेच्या कर विभागाशी संपर्क साधणे आवश्यक ठरणार आहे.

मालक किंवा बिल्डरच्या नावावर आधीच आकारणी असेल तरएखाद्या अपार्टमेंटमधील फ्लॅटची मालमत्ता कर आकारणी मूळ मालक अथवा बिल्डरच्या नावावर झालेली आहे; मात्र इमारतीचा वापर परवाना उपलब्ध नाही, अशा प्रकरणातही कर आकारणीची नोंद केवळ या कारणामुळे प्रलंबित ठेवू नये.
मिळकतधारकाकडून वापर परवाना अथवा अन्य कारणांमुळे कर आकारणी करून घेतली नसल्यास, मूळ मालक अथवा बिल्डरचे नाव मालकी हक्काच्या नोंदीत कायम ठेवून प्रत्यक्ष वापर करणाऱ्या व्यक्तीचे नाव भोगवटादार म्हणून नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी काय करावे
फ्लॅट, गाळा किंवा नवीन मिळकत खरेदी करून त्याचा वापर सुरू केलेल्या नागरिकांनी आपली मालमत्ता कर नोंद झाली आहे की नाही, याची खात्री करावी. कर आकारणी झालेली नसल्यास संबंधित कर विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

विशेषतः फ्लॅट खरेदीची तारीख, लाईट बिलाची तारीख, मालकी हक्काची कागदपत्रे आणि उपलब्ध बांधकाम/परवानगीशी संबंधित कागदपत्रे यांची माहिती नागरिकांनी सोबत ठेवावी.

नवीन मिळकतींची कर आकारणी ही महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाच्या मालमत्तेची अधिकृत कर नोंद होण्यासाठीही आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मिळकतीची कर आकारणी व नोंदणी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

Next Post

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

Related Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
Next Post
रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026