सन २०२६-२७ NHM PIP अंमलबजावणीसाठी नियोजनाला गती देण्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांचे निर्देश
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाची कार्यकारी समिती व पी.आय.पी आढावा बैठक आज जिल्हा परिषद येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये सन २०२६-२७ च्या पी.आय.पी मध्ये मंजूरी मिळालेल्या विविध आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेऊन त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या
- एन.एच.एम पी.आय.पी.चा आढावा घेऊन मंजूर बाबींच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- पंधरावा वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला.
- तालुकास्तरावरील प्रयोगशाळा बांधकामे व त्यातील आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- मंजूर केलेला निधी, मार्च – 2027 अखेर संपूर्णपणे खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या
- सेवा संकल्पत अभियान अंतर्गत DBT विषयक लाभ देणेकामी, लाभार्थी, आशा स्वंयसेविका, आरोग्य सेविका यांचे अधार सिंडीग विषयक शिबीर आयोजित करुन, प्रलंबित देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगार यांच्याकरीता आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत संबंधित नियुक्त कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
- प्रलंबित व थकीत देयके सादर करण्यासोबतच, खराब झालेल्या कोल्ड चेन उपकरणांची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आली.

















