• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
1
VIEWS

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे नुकसानग्रस्त पिकांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या सुमारे 50 टक्के असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः पावसाच्या खंडामुळे सोयाबीन व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी शेंगा लागलेल्या दिसत असल्या तरी त्यामध्ये दाणे भरलेले नसल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन व उडीद पिकांची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंचनाम्याची कार्यवाही नियमानुसार; सरसकट मदतीसाठी प्रयत्न

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे नियमानुसार करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. मदत देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. शासनाची मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सुमारे 130 दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध

पिकांचे नुकसान झाले असले तरी जिल्ह्यात जवळपास 130 दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. ज्या भागात चाऱ्याची कमतरता आहे, त्या भागात इतर ठिकाणांहून चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व भागांत चारा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. आवश्यकता भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार

जिल्ह्यातील अनेक लहान व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. उजनी धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या कार्यवाहीला गती

उजनी धरणातील गाळ काढण्याबाबतही शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणांतर्गत उजनी धरणाचाही समावेश आहे. यामुळे भविष्यात धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून, गाळाचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. राज्य शासनाने उजनीसह पाच मोठ्या धरणांमधील गाळ काढण्यासंदर्भातील सुधारित धोरणास मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, चारा व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करून पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या

Previous Post

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

Related Posts

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील
इतर घडामोडी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

September 23, 2026
पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

September 23, 2026
विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक
इतर घडामोडी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
Next Post
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026