सोलापूर : सोलापूर शहरातील विविध नागरी सुविधांचा आढावा घेत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर विनायक कोंड्याल यांनी आज शहरातील चिप्पा मार्केट परिसर, कर्णिक नगर येथील उद्यान व चिल्ड्रन पार्क तसेच एमआयडीसी परिसरातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी संबंधित विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून विविध नागरी प्रश्नांची माहिती घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
महापौर विनायक कोंड्याल यांनी चिप्पा मार्केट परिसराला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नागरिक व व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती त्यांनी घेतली. परिसरातील स्वच्छता, नागरी सुविधा तसेच आवश्यक त्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर महापौरांनी कर्णिक नगर येथील उद्यान व चिल्ड्रन पार्कची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून नागरिक, लहान मुले तसेच परिसरातील रहिवाशांसाठी आणखी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, याबाबत माहिती घेतली. उद्यानातील आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता, देखभाल तसेच नागरिकांच्या सोयीसाठी करावयाच्या विविध कामांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी एमआयडीसी परिसरातील एमएसईबी कार्यालयास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका ज्या मार्गावरून जाणार आहेत, त्या मार्गावरील विद्युत तारांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी सुनील नगर येथील विसर्जन कुंडाची सुद्धा महापौराने पाहणी केली.
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, गणेश मंडळांना तसेच भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि विद्युत तारांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील धोकादायक व खाली आलेल्या विद्युत तारा, केबल्स तसेच इतर विद्युत अडथळे वेळेत दूर करण्याच्या सूचना महापौरांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी महापालिका व एमएसईबीच्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.या पाहणी दौऱ्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे सभापती विजय चिप्पा नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक शेखर इगे नगरसेविका सुनिता कामाठी, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, राज महिंद्र कमटम , नगरसेवक मेघनाथ येमूल सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सह आयुक्त युवराज गाडेकर, अनिल चराटेशंकर चौगुले,झोन अधिकारी विजय लोखंडे, यांच्यासह महापालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


















