सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट अखेर अवघा 189 मिलिमीटर पाऊस पडला असून टंचाईच्या झळा वाढू लागले आहेत. अनेक पिके धोक्यात आली आहेत. पावसाळ्याचे दिवस असताना देखील सोलापूर जिल्ह्यात 37 टँकरच्या माध्यमातून 48 दावे 169 वाड्यावर असत्या आणि ७२६३८ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माढा तसेच सांगोला तालुक्यात प्रत्येकी आठ तर माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी चार टँकर सुरू झाले आहेत करमाळा तालुक्यात सहा तर उत्तर सोलापूर तालुक्यात पाच आणि अक्कलकोट मध्ये एक पाणी टँकर सुरू झाला आहे. एकीकडे उजनी धरण 100% भरले असताना दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा जाणवू लागले आहेत.








