सोलापूर – संभाजी ब्रिगेड च्या वतीने सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधान सभा अंदाज मंडळ समिती चे अध्यक्ष अर्जुन खोतकर याना शासकीय विश्रामगृहात भेटून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत व विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या कामाची चौकशी समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ याबाबत कारवाई होईल असे आश्वासन दिले.

तक्रारी मध्ये वीस मुद्दे असून जिल्हा रुग्णालयाकडील विविध टेंडर प्रक्रियामध्ये आर्थिक अनियमितता झालेली असुन पंढरपूर येथील आषाढी वारी करीता औषध , Air ambulance System , चष्मा खरेदी , तसेच कर्मचारी यांना त्रास देणे , जाहिरात बिला बाबत , कर्मचारी बेले यांना पाठीशी घालणे ,जिल्हा रुगणालयात व कार्यालयात कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाहीत, तसेच OPD ला ही डॉक्टर नसणे स्वत: सोमवार व शुक्रवारी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नसणे,जिल्हय़ात विविध आरोग्य संस्था मध्ये ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टर वेळे वर उपलब्ध नसणे ग्रामीण रुग्णालय माढा येथे बाळंत मातेच्या नातेवाईकांना स्वच्छता करण्यास लावल्याने तेथील,मंगळवेढा येथे सोलापूर माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिल्यानंतर तेथील व्यवस्था वर नाराजी झाली असुन शल्य चिकित्सक यांचेवर करावाई झाली नसणे ,तांदूळवाडी येथील दुर्घटना झालेल्या मृतदेहांची अवहेलना झालेली स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबानी नाराजगी व्यक्त झाली असून त्यांच्यावर कारवाई न होणे.
पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या अस्वच्छता व विविध ऑपरेशन मध्ये झालेल्या गंभीर चुका याबाबत पाठीशी घालून आर्थिक निमित्त करणे,जिल्हा रुग्णालयातील MVG मधील बरेच कर्मचारी हे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच इन्चार्ज सिस्टर बेले व डॉ कुलकर्णी यांच्या घरी घरगुती कामकाज करणे व कामाला लावणे ,PCPNDT चा आर्थिक टेबल हा काकडे नामक व्यक्तीकडे असून, पदभार न काढणे डॉ.श्रीकांत कुलकर्णी, हे वैद्यकिय अधिकारी प्रशिक्षण केंद्र येथे नियुक्ती असतांना त्यांना आर्थिक कामकाजामध्ये मदत घेणे अशी निवेदनात तक्रार केली आहे. त्याचबरोबर विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामांमध्ये करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार झाला असून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त हे संबंधित अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास व ठेकेदारास पाठीशी घालत आहेत तरी याबाबत चौकशी समिती नेमून दोषीवर कारवाई करावी ही मागणी सुद्धा करण्यात आली.
सदर निवेदनाची प्रत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.आरोग्य मंत्री, मा.प्रधानसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मा.आयुक्त मुंबई यांचेकडे ईमेल द्वारे सादर करण्यात आले आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर बंटी गायकवाड प्रकाश व्यवहारे हनुमंत पवार अदि ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते










