• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2026
in इतर घडामोडी
0
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
0
SHARES
1
VIEWS

श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

सोलापूर- सालाबादप्रमाणे आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सोलापूर शहरात आगमन होणार असून पालखीचा शहरात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि आवश्यक तयारीचा आढावा घेण्यात आला.या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका कल्पना कदम,माजी नगरसेवक दिलीप कोल्हे,नगर अभियंता सारिका आकूलवार, अग्निशमन विभागाचे राकेश साळुंखे, अवचित दुधाळ, गजानन महाराज शेगाव संस्थानचे स्थानिक प्रतिनिधी सुनील कुलकर्णी व सुनील फाळके, उद्यान अधिकारी कोमल काशीद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पाहणीची सुरुवात रूपाभवानी पाणी गिरणी चौक येथून करण्यात आली. याच ठिकाणी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर तुळजापूर वेस, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर, बाळी वेस, टेलिफोन भवन, कुंभार वेस, करण चौक मार्गे कुचन प्रशाला येथे पालखीच्या मुक्कामस्थळाची पाहणी करण्यात आली.

यावेळी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहन व्यवस्था, वाहतूक नियोजन, मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच इतर नागरी सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.त्यानंतर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालयांची पाहणी करण्यात आली. पुढे मोदी रेल्वे ब्रिज ते दमाणी नगर या मार्गाचीही पाहणी करून आवश्यक कामांची नोंद घेण्यात आली.यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना पालखी मार्गावरील सर्व अडथळे तात्काळ दूर करणे, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे, रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविणे, स्वच्छता अधिक प्रभावीपणे करणे, प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.महापौर विनायक कोंड्याल म्हणाले :”श्री गजानन महाराज पालखी सोहळा हा सोलापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. हजारो वारकरी शहरात येत असल्याने त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता, पाणी, आरोग्य, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि इतर सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले :”पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन, प्रकाश व्यवस्था, वाहतूक आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करून वारकऱ्यांना सुरक्षित व सुकर सेवा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.”सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असून, पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

Next Post

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

Related Posts

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
Next Post
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026