• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2026
in इतर घडामोडी
0
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
0
SHARES
2
VIEWS

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था, पाणी, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना…

सोलापूर : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भाविक व पालखीसोबत येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन, मुक्कामाच्या ठिकाणची व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव,नगरसेविका राजेश्री दोडमणी,सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, नगर अभियंता सारिका आकूलवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधी सुनील फाळके व सुनील कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधींनी महानगरपालिकेकडून दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध सुविधा व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी पाणी गिरणी येथील स्वागतस्थळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी व फिरते स्वच्छता पथक नियुक्त करावे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, मुक्कामाच्या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त फोकस लाईटची व्यवस्था करावी, पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावेत तसेच रुग्णवाहिकेची सुविधा कायम ठेवावी, अशा सूचना व मागण्या मांडण्यात आल्या.

बैठकीत महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, प्रतिवर्षी श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना सोलापूर शहरात दोन दिवस मुक्काम करते. या कालावधीत हजारो भाविक आणि पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी शहरात येत असतात. त्यामुळे प्रत्येक भाविक व वारकऱ्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्व नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना पालखी मार्गाची संपूर्ण स्वच्छता करणे, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, मार्गालगत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, अखंड प्रकाश व्यवस्था ठेवणे, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, पाण्याचे टँकर, मोबाइल स्वच्छतागृहे, नियमित स्वच्छता, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, औषधोपचाराची प्राथमिक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

तसेच पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी स्वच्छ व सुरक्षित परिसर, पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, स्वच्छतागृहांची देखभाल, कचरा संकलनासाठी विशेष पथके तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

यावर्षी पालखी मार्गामध्ये काही ठिकाणी बदल झाल्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या मार्गांवरही स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था व इतर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. तसेच महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून वाहतूक, सुरक्षा व गर्दी व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळावे, असेही त्यांनी सांगितले.

महापौर श्री. विनायक कोंड्याल म्हणाले, “श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा श्रद्धा, सेवा आणि समन्वयाचा उत्सव आहे. सोलापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविक आणि वारकऱ्याला स्वच्छ, सुरक्षित व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा निर्विघ्न आणि यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक व वारकऱ्यांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने सोहळ्यात सहभागी व्हावे.”

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
Next Post
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026