• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2026
in Blog
0
उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी
0
SHARES
42
VIEWS
  • ज्या विभागांचे बांधकाम उड्डाणपुलाच्या जागेत येत असतील, त्यांना उपलब्ध इतर जागेत तसेच बांधकाम करून द्यावे.
  • सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार.
  • -उड्डाणपुलासाठी खाजगी जागा भूसंपादनासाठी आतापर्यंत 96 कोटीचा निधी खर्च तर आणखी 15.33 कोटीची मागणी

सोलापूर- सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार राज्य शासनाच्या सर्व विभागांनी उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेली जागा विनामूल्य उपलब्ध करून द्यावयाची आहे. तर केंद्र शासनाच्या विभागांना त्यांच्या मागणीनुसार आहे तसे बांधकाम इतर जागेत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, सर्व संबंधित विभागांनी उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेली जागा त्वरित प्रशासनाकडे सुपूर्द करावी, असे ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत परदेशी मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाव्यवस्थापक स्वप्नील कासार, विशेष भूसंपादन अधिकारी प्रवीण बास्तेवाड यांच्यासह सर्व केंद्र व राज्य शासनाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

सीईओ परदेशी पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व विभागांनी उड्डाणपुलात जाणाऱ्या त्यांच्या जागेचा ताबा त्वरित जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावा. राष्ट्रीय महामार्गाने उड्डाणपुलाच्या एकूण जागेपैकी ९०% जागा त्यांच्याकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्वरित कामाला सुरुवात करावी. तसेच केंद्र शासनाच्या पोस्ट, बीएसएनएल व रेल्वे या विभागांच्या कंपाऊंड वॉल, गेट व इतर बांधकामे त्वरित उभी करून द्यावीत. तसेच महापालिकेने या विभागांना शासनाच्या अधिकृत बाजारमूल्यानुसार त्याच्या दुप्पट मोबदला अदा करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.

त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी त्वरित जागा प्रशासनाच्या ताब्यात द्यावी. राष्ट्रीय महामार्गाने राज्य परिवहन, उत्पादन शुल्क, डेअरी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय यांच्या कंपाऊंड वॉल तसेच अन्य बांधकामे उड्डाणपुलासाठी आवश्यक असतील, तर ती त्यांना इतर जागेत पुन्हा बांधून द्यावीत. तसेच वीज वितरण कंपनीचे सात रस्ता परिसरातील पूर्ण उपविभाग कार्यालय बाधित होत असल्याने, वीज वितरण कंपनीच्या इतर जागेवर त्यांना पूर्ण बांधकाम उभे करून द्यावे. यासाठी आवश्यक निधी महापालिकेने उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना परदेशी यांनी दिल्या. तसेच वस्त्रोद्योग विभागाच्या जागेवरील गिरणी बंद असल्याने ही जागा त्वरित प्रशासनाने ताब्यात घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील हा उड्डाणपूल झाल्यानंतर शहरातील वाहतूक खूपच सुरळीत होईल. तरी सर्व विभागांनी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी आणि विहित वेळेत हा उड्डाणपूल सोलापूरकरांसाठी उपलब्ध करावा, असे आवाहन परदेशी यांनी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, पुणे विभागीय आयुक्तांकडून खासगी जागेवरील निवाडा करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे त्या जागेचा निवाडा घोषित करून संबंधित मिळकतदारांना भरपाई देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी यांनी सोलापूर महापालिकेकडे 15.33 कोटी निधीचे मागणी पत्र दिलेले आहे. सोलापूर उड्डाणपूल प्रकल्प हा निकडीचा प्रकल्प म्हणून मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शासनाच्या २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली राज्य शासनाची जागा विनामूल्य व आगाऊ ताब्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी शासन निर्देशांप्रमाणे बाजारमूल्यानुसार जागेचे मूल्य काढून त्याच्या दुप्पट मोबदला केंद्र शासनाच्या जागेसाठी देण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ज्या विभागांची बांधकामे या उड्डाणपुलासाठी बाधित होतील, ती बांधकामे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी महापालिका उपलब्ध करून देईल, असे सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाव्यवस्थापक कासार यांनी उड्डाणपुलाच्या एकूण जागेपैकी ९०% जागा राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगितले

Previous Post

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026