• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2026
in इतर घडामोडी
0
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर- महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर तसेच सर्व तहसीलदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. या निवडणुकीसाठी ६ मतदान केंद्रे, २ उमेदवार आणि एकूण ६१६ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक जाहीर व आचारसंहिता दिनांक १८ मे २०२६ रोजी लागू झाली असून मतदान दिनांक १८ जून २०२६ सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २२ जून २०२६ रोजी पार पडणार आहे.मतदान केंद्रांवर मतदारांची यादी पुरविण्यात येणार असून अधिकारी व कर्मचारी यांनी ती नीट तपासून खात्री करावी. नगरपंचायत व नगरपरिषद केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.

मतदान अधिकारी नियुक्ती :क्षेत्रीय अधिकारी – उपजिल्हाधिकारी मतदान केंद्राध्यक्ष – तहसिलदारमतदान अधिकारी क्र.१ – नायब तहसिलदारमतदान अधिकारी क्र.२ – अव्वल कारकूनमतदान अधिकारी क्र.३ – अव्वल कारकून/लिपिकमतदान कर्मचारी – शिपाईस्थानिक स्वराज संस्थेचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची मतदार ओळख पटविण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतदान पद्धत : मतदारांना उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम अंकात लिहावा लागेल. हा क्रमांक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय भाषांतील अंकात लिहिता येईल, परंतु शब्दात लिहिता येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरूनच मतदान करावे. प्रत्येक मतपत्रिकेला काउंटर फाईल असेल ज्यावर मतदार यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक व मतदाराची स्वाक्षरी/अंगठा नोंदविला जाईल.

निवडणूक साहित्य वितरण : दिनांक १७ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बहुद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे साहित्य वितरण होईल. मतदान केंद्राध्यक्षांनी मतपेटी, मतपत्रिका, स्केचपेन, सील, टॅग, मतदार यादी इत्यादी साहित्याची काळजीपूर्वक तपासणी करावी.

मतदान केंद्रावरील दक्षता : मतदान केंद्रावर १०० मीटर परिसरात सुरक्षा यंत्रणा राबविण्यात येईल. मतदान पथक व प्रतिनिधींनी गोपनीयतेची शपथ घ्यावी. मतदान केंद्रात मोबाईल, स्मार्टवॉच यांसारखी उपकरणे नेण्यास बंदी असेल. मतदाराने मतपत्रिका दाखविल्यास ती रद्द केली जाईल.

यावेळी निवडणूक निरीक्षक श्रावण हार्डीकर यांनी मतदान केंद्रांवर दबाव आणण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे सर्व पथकांनी सतर्क राहावे, असे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेत गोपनीयता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यांचा योग्य वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

सिद्धेश्वर तलाव संवर्धनासाठी महापालिकेची मोठी बैठक; जलगुणवत्ता सुधारणा व सुशोभीकरणावर भर

Next Post

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026