भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या विकासासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती साधली आहे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेतून निवडून येऊन यशस्वी पंतप्रधान म्हणून १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर येथे महाआरती करण्यात आले.


या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.जयकुमार गोरे ,महापौर विनायक दादा कोंड्याल,श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराजजी काडादी, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते, भाजप सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मनीष देशमुख, माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक ऊर्जा लाभो. भारतमातेची सेवा करण्यासाठी त्यांना आणखी अनेक वर्षे पंतप्रधान म्हणून कार्य करण्याची संधी मिळो व त्यांच्या नेतृत्वाखाली देश अधिक समृद्ध, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर बनो.”सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या ध्येयाने भारत प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत राहो, हीच सदिच्छा. जय हिंद!










