• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2026
in Blog
0
सृजन अभियानातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल
0
SHARES
4
VIEWS

त्रिवेंद्रम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तसेच केरळ राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांची त्रिवेंद्रम येथील केरळ विधानसभा कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सृजन अभियान राबविताना झालेली अनागोंदी, नियोजनातील त्रुटी, कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी तसेच पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी सादर केले.

भेटीदरम्यान खालील महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या :

१) आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मंडळाच्या भावना तसेच सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विषयांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (CWC) बैठकीत विचार करण्यात यावा.

२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार व विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटनात्मक प्रश्नांबाबत माननीय काँग्रेस अध्यक्ष, माननीय राहुल गांधी, माननीय प्रियंका गांधी आणि पक्षातील अनुभवी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात यावा.

३) विद्यमान निवड प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या नैतिक, संघटनात्मक व लोकशाही संदर्भातील प्रश्नांचा विचार करून सदर प्रक्रिया स्थगित अथवा बरखास्त करण्यात यावी. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद २२, २३ व २४ नुसार पारदर्शक, लोकशाही आणि नैतिक अधिष्ठानावर आधारित जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी.

तसेच सृजन अभियानासाठी सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक, ओडिशा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार देवाशिष पटनायक यांनी सादर केलेल्या अहवालाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

मा. रमेश चेन्निथला यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य स्तरावर याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनहित आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील, असा विश्वास मा. रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला.

Previous Post

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

Next Post

फसव्या जाहिरातींवर FDA ची कारवाई…!

Related Posts

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Next Post
फसव्या जाहिरातींवर FDA ची कारवाई…!

फसव्या जाहिरातींवर FDA ची कारवाई…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026