• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्तम समाजव्यवस्थेसाठी शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2026
in Blog
0
उत्तम समाजव्यवस्थेसाठी शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता
0
SHARES
5
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे : बसवरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

सोलापूर : महापुरुषांची स्मारके आपल्या समाजाची शक्तीस्थळे आहेत. उत्तम समाजव्यवस्थेसाठी या शक्ती स्थळांच्या बळकटीची आवश्यकता आहे. त्यामुळेच ४०० कोटी रुपये खर्चून २२ एकर जागेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य स्मारक करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळातर्फे शुक्रवारी फडकुले सभागृहात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, माजी खासदार अमर साबळे, ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव बसवराज सावळगी, उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि. प. चे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, ट्रस्टी रेवणसिद्ध आवजे, सुदीप चाकोते,
केदार वनारोटे, गणेश चिंचोली, आनंद मुस्तारे, अक्षय अंजिखाने, किसन जाधव उपस्थित होते.

यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील ( वैद्यकीय क्षेत्र), महादेव बुक्कानुरे ( सामाजिक क्षेत्र), पंडित जवळकोटे (बांधकाम व्यवसायिक), अनुप्रिता अंदेली (सामाजिक क्षेत्र), सदाशिव पडदुणे (सामाजिक क्षेत्र), सिद्धेश्वर पाटील (सामाजिक क्षेत्र), संतोष पाटील (सामाजिक क्षेत्र) डॉ. दीपिका चिंचोळी (वैद्यकीय क्षेत्र), राजश्री थळंगे (सामाजिक क्षेत्र) प्रा. गायत्री बिराजदार (शैक्षणिक क्षेत्र), रूपा स्वामी (सामाजिक क्षेत्र ) यांना बसवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि शेला असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांचाही बसव सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांचे स्मारक सर्वार्थाने उत्तम व्हावे याकरिता अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. हा अभ्यास गट बसवकल्याणसह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करून अभ्यास करणार आहे. त्यानुसार स्मारकाची रचना करण्यात येणार आहे. नियोजित स्मारकाच्या १५ एकराच्या जागे शेजारी असलेले सात एकर तळेदेखील महात्मा बसवेश्वर स्मारकाला देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले.

महामंडळाचे उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी स्वागत केले. ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

बसवेश्वर स्मारक मंजूर केल्याबद्दल पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

मंगळवेढा येथे नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी १५ एकर जमीन आणि ४०० कोटी रुपयांचा निधी तसेच सोलापुरातील बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल वीरशैव लिंगायत समाज व मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. मानपत्र, म्हैसूर पगडी, शेला आणि पुष्पहार घालून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सन्मानित करण्यात आले.

महात्मा बसवेश्वर हे अर्थक्रांतीचे प्रणेते

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी त्यांच्या शिकवणुकीतील समाजामध्ये आर्थिक क्रांती घडवून आणली. गोरगरिबांना कायकवे कैलास अर्थात काम हाच कैलास आहे याची शिकवण दिली. त्या अर्थाने महात्मा बसवेश्वर हे जगातील पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. आर्थिक क्रांतीचे उद् गाते होते, असे गौरवोद्गार शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी याप्रसंगी काढले.

Previous Post

आय कार्ड आणि कीट नसली तरी जनगणना करा…अन्यथा शिक्षकांवर गुन्हे !

Next Post

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026