सोलापूर – राष्ट्रसंत गाडगे महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे नाका येथील स्मशान भूमित अखिल परिट समाज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, सोलापूर शहर, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे महापरिनिर्वाण, सोलापूर शहरातील समाज बांधव हे तिथीनुसार करीत असतात.
आज दि. ६ डिसेंबर २०२५ पासून ते ८ डिसेंबर तिथिनुसार पुण्यतिथीचा कार्यकाल असतो. प्रथम दिवस म्हणून आज पुणे नाका येथे स्मशानभूमिची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास समाज बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमासाठी संस्थेचे व्रिश्वस्त अध्यक्ष दिनेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विष्णु गायकवाड यांनी सुचविलेल्या या उपक्रमासाठी दत्तत्रय काटकर, अनिल भोसले, गणेश वारे, दत्तात्रय गायकवाड, शिवा भोसले, सुनिलजी कणसे, मुकुंदराज ढावणे, सौरभ शिंदे, सिध्देश्वर ननवरे, शंकर सावगे, विजय वाघमारे, रितेश वाघमोडे, शिवा नंदुरे, शिवानंद ननवरे, मनोज पंधारकर, राहुल गायकवाड, बालाजी काटकर, महादेव काटकर, दयानंद काटकर, सुभाष गायकवाड, ऋषिकेश राखे, प्रतिक गायकवाड, ओंकार सोळखे, सुरज शिंदे, संदीप भोसले, प्रविण ननवरे, महेश काटकर, वैभव गवळी, आकाश ताटवे, अभिषेक सोनवणे व सोमा काटकर तसेच समाजातील सर्व जेष्ठ नागरीक हजर होते.

