पारा खेळतोय संगीत खुर्ची

सोलापुरातील थंडीमध्ये चढ उतार होत असून ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी होत चालली आहे.एक डिसेंबर रोजी सोलापुरातील पारा तापमान 16°c इतक्या किमान घरात पोचला होता, तर काल चार तारखेला तो 18.6°c इतक्या किमान तापमानापर्यंत वर चढला. पारा कमाल घरात 31 अंश सेल्सिअसमध्ये स्थिरावला. नोव्हेंबर महिना संपल्यापासून थंडीचा जोर ओसरत चालल्याचे दिसून येत आहे.

