• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन..

by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन..
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज होणार देहदान

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी असलेले जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पक्षात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ या कर्मस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचा मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात देहदानासाठी आणण्यात आला. आज बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे देहदान होणार आहे.

प्राथमिक शालेय शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. काही वर्ष पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी राजकीय,आर्थिक, वैज्ञानिक विषयावर 40 पुस्तके लिहिली आहेत. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली.

आणीबाणीच्या काळात ते भूमिगत राहिले. भूमिमुक्ती आंदोलनात तब्बल चार वेळा त्यांना तुरुंगास झाला होता. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातील त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.बार्शी येथील विधानसभा आणि सोलापूरची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती.

Previous Post

केंद्राचा ‘संचार’ नकोच…

Next Post

दहावी बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार…

Next Post
दहावी बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार…

दहावी बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In