प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गुरू नानक साहिब जींच्या ५५६ व्या प्रकाश गुरपुरब निमित्त गुरूद्वारा श्री गुरू नानक दरबार, ९४/२, अंत्रोळीकर नगर, गुरूद्वारा रोड, सोलापूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते १० या वेळेत मधुर बाणी कीर्तन तसेच गुरू का लंगर आयोजित केला जाणार आहे.या प्रसंगी वीर हरभजन सिंग जी तसेच भाई हरदीप सिंग जी, हजूर साहिब नांदेड़ वाले यांच्या उपस्थितीत गुरप्रसादि विद्यालय, उल्हासनगर चे कीर्तन जत्थे द्वारे कीर्तन सादर केले जाणार आहे.विशेष कार्यक्रम ५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी ६ ते ९ कीर्तन, १० ते २ श्री गुरू ग्रंथ साहिब जींच्या पाठाची समाप्ती तसेच रात्री १० ते १ सत्संग कीर्तन होईल.या पवित्र प्रसंगी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गुरूद्वारा समितीने केले आहे.

