• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2025
in इतर घडामोडी
0
आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..
0
SHARES
0
VIEWS

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आयोगाकडून 18 महिन्यात अहवाल सादर करण्यात येणार आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि त्याशिवाय पेन्शनधारकांना देखील याचा लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे.

8th Pay Commission Terms of Reference : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाची रचना, टर्म्स ऑफ रेफरन्स आणि कालमर्यादा या बाबींना मंजुरी दिली आहे. हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये संरक्षण सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याशिवाय 69 लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाकडून अहवाल 18 महिन्यांमध्ये देण्यात येईल. या आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात नवी दिल्ली निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील तेव्हा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल.

आठव्या वेतन आयोगाकडून पगारासंदर्भात शिफारशी करण्यात आल्यानंतर त्या जेव्हा केंद्र सरकारकडून मान्य होतील, तेव्हा त्या लागू होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली.

वेतन आयोगाचा कालावधी साधारणपणे 10 वर्ष असतो. 7 व्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2014 मध्ये झाली होती. तर, त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्यात आली होती. आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित होतं.

सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2026 ला संपणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवून दिला जातो. महागाईपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. साधारणपणे महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातील निर्णय जानेवारी आणि जुलैपासून लागू होतो. महागाई भत्ता उशिरानं जाहीर झाल्यास कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम दिली जाते. आता आठवा वेतन आयोग लागू होत असताना कशी प्रक्रिया असणार हे पाहावं लागेल.

Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद: चक्क मुख्यमंत्र्यांवर आली मध्यस्थी करण्याची वेळ

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

Related Posts

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

ताज्या बातम्या

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026