बी.सी.सी.आय.अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय टी 20 सामन्यासाठी 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघ घोषित करण्यात आला.
जवळपास दोन महिने चाललेल्या प्रदीर्घ अशा निवड प्रक्रियेनंतर महाराष्ट्र अंडर 19 महिला संघात सोलापूर च्या आर्या उमाप व भक्ती पवार यांनी स्थान मिळवले.
26 ऑक्टोबर पासून मुंबई येथे 19 वर्षाखालील महिलांचे राज्यस्तरीय टी 20 सामने होत आहेत.या सामन्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आर्या उमाप व भक्ती पवार यांची निवड झाली आहे . मुंबई येथे वानखेडे स्टेडियम व सचिन तेंडुलकर जिमखाना या मैदानावर महाराष्ट्र संघ दिल्ली ,केरळ,गोवा, हैदराबाद आणि छत्तीसगड या संघाशी लीग सामने खेळेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर पासून कलकत्ता याठिकाणी पुढील फेरीचे सामने व अंतिम सामना होईल.
दोघींनाही स्नेहल जाधव मॅडम, किरण मणियार मॅडम, सारिका कुरुलकर मॅडम, मानसी जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष- दिलीप माने, चेअरमन- रणजित सिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन- श्रीकांत मोरे, तसेच उपाध्यक्ष- प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख व संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सु सर व कार्यकरणी सदस्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

