• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्याच्या विविध 26 विभागात अनुकंपा 110 तर एमपीएससी द्वारा नियुक्त लिपिक 96 असे एकूण 206 उमेदवारांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियुक्ती आदेशाचे वितरण झाले.

शासन सेवेत प्रवेश करणाऱ्या सर्व उमेदवारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उमेदवारांनी आपल्या मातीची सेवा करण्यासाठी तत्पर राहावे

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी दहा हजार उमेदवारांना शासकीय सेवेत घेण्याचा कार्यक्रम होत आहे, मुंबई येथून मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.

सोलापूर, दिनांक 4(जिमाका):- राज्यात यापूर्वी अनुकंपा भरती मध्ये खूप अडचणी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनुकंपाच्या सर्व अडचणी दूर करून एकच नवीन शासन निर्णय काढला, त्यानुसार संपूर्ण राज्यभरात अनुकंपाचे 5187 तर एमपीसीद्वारा निवडलेले लिपिक 5122 असे एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी व्यक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात होत आहे. सोलापूर जिल्ह्यात आज अनुकंपा ड वर्ग 60 व क वर्ग 50 तसेच राज्य लोकसेवा आयोगाद्वारा नियुक्त 96 असे एकूण 206 उमेदवार यांना नियुक्ती आदेश देऊन शासन सेवेत रुजू केले जात आहे. तरी या सर्व उमेदवारांसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण असून त्यांनी आपल्या मातीची सेवा करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री
जयकुमार गोरे यांनी केले.


जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून शिफारस केलेल्या नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण प्रसंगी पालकमंत्री श्री. गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शहर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच अनुकंपा व लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते.


पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, आज भरती होणाऱ्या सर्व उमेदवाराच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा हा दिवस आहे. आज पासून आपण शासकीय सेवेत रुजू होणार असल्याने आपण आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी. आपल्या मातीची सेवा मनापासून करावी. शासन सर्व अनुकंपा कुटुंबासोबत सदैव असून अनुकंपा भरती ही शासनाची खूप मोठी जबाबदारी होती व शासन ती जबाबदारी पार पाडत आहे. अनुकंपा मधील उमेदवारांना न्याय देण्यासाठी शासनाने कायदा बदलला. मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


सोलापूर जिल्ह्यात अनुकंपा भरतीच्या 110 उमेदवारांचे निवडीकरचा जिल्हा प्रशासनाने मागील चार महिन्यापासून अत्यंत नियोजनबद्ध व पारदर्शकपणे काम केलेले आहे त्यात जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व टीमचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले तसेच नवीन भरती होणाऱ्या सर्व 206 उमेदवारांना त्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आजपासून शासन सेवेत रुजू होणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासकीय सेवेत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. यातून जनसेवा करण्याची मोठी संधी आपल्याला लागणार असून आपण त्यात यशस्वी व्हावे असेही त्यांनी आवाहन केले. तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रशासकीय सेवा व लोकसेवा तशा पहिल्या तर एकच असून पण त्यात मूलभूत फरक आहे आपण आज शासकीय सेवेत रुजू होत आहेत तरुण लोकसेवा करण्याचे ध्येय बाळगावे असे त्यांनी सांगितले.


निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी अनुकंपा भरती साठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देऊन या अंतर्गत ड वर्ग 60 तर क वर्ग 50 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येत असून ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्याचे सांगितले तसेच एमपीसी कडून लिपिक वर्गीय 96 कर्मचारी जिल्ह्याला मिळाले असून त्या सर्वांची नियुक्ती आज पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आदेश वितरित करून 26 विभागाअंतर्गत केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.


मुंबई येथील मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हास्तरीय कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार दिनेश पारगे, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह महसूल विभागातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

             
Previous Post

सोलापूर महानगरपालिकेच्या ‘घट संकलन’ उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांचा भरघोस प्रतिसाद

Next Post

चिप्पा भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहीम : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केली पहाणी..

Related Posts

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद
इतर घडामोडी

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
चिप्पा भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहीम : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केली पहाणी..

चिप्पा भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहीम : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केली पहाणी..

ताज्या बातम्या

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026