• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एआयची भीती बाळगण्याऐवजी त्यातील संधी शोधा : डॉ. भूषण केळकर यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2025
in इतर घडामोडी
0
एआयची भीती बाळगण्याऐवजी त्यातील संधी शोधा : डॉ. भूषण केळकर यांचे आवाहन
0
SHARES
2
VIEWS

कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमाला पुष्प दुसरे

सोलापूर : सध्या बहुतांश क्षेत्रात एआय हे तंत्रज्ञान आले आहे. हे तंत्रज्ञान कुठपर्यंत गेले आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. या क्षेत्रामुळे नोकऱ्यांवर गदा येईल, अशी भीती बाळगण्याऐवजी त्यातील संधी शोधण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय एआय तज्ञ डॉक्टर भूषण केळकर यांनी केले.


कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत एआय आव्हाने आणि संधी या विषयावर डॉ.भूषण केळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पाटील, संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने, माजी नगरसेवक बाळासाहेब माने, माजी नगरसेविका प्रिया माने, पांडुरंग चौधरी, अजित माने, स्वाती माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉक्टर केळकर म्हणाले की एआय क्षेत्रात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर, त्यांनी ‘पायथन प्रोग्रॅम’ आणि माहितीचे विश्लेषण (डेटा अनालिसिस) चे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यासह, इंग्रजी भाषेबरोबर परदेशी भाषा शिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यास आणि ज्ञान संपादन करून चालणार नाही तर, मानसिक स्वास्थ्याकडे आणि शारीरिक स्वास्थाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी दररोज योग, प्राणायम केले पाहिजे.

इंडस्ट्री ४.० येऊन १२ वर्षे झाली. परंतु, तरी अनेकांना त्याविषयी माहीत नाही, याची खंत वाटते. सर्वच प्रकारच्या सर्जनशील क्षेत्रात सुद्धा एआयने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. आपण सगळ्यांनी जागे होण्याची गरज आहे. चॅट जीपीटीमुळे कला क्षेत्रातील बऱ्यापैकी नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे. एआयद्वारे आपल्या मनामध्ये काय सुरू आहे, हे समजते. त्यामुळे करिअर निवडताना किंवा त्यात विकसित होताना सुद्धा आपण एआयला टाळू शकत नाही. या क्षेत्रामुळे या सर्व नोकऱ्या नष्ट होतील, असे टीसीएस कंपनीने दावा केला आहे. या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर अनेकजण जॉब मिळण्याची स्वप्न पाहून बीए, बीकॉम, एमए, एमसीए करत असतात. त्या लोकांना ही विधाने माहिती असली पाहिजे. एआयने आपल्या जीवनात प्रवेश केला आहे.तो आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या फक्त हे माहिती नाहीये. या तंत्राज्ञानाच्या खोलात गेले पाहिजे, त्याची माहिती करून घेतली पाहिजे. हे तंत्रज्ञान इतर देशांमध्ये आहे, आपल्याकडे नाही, या भ्रमात राहिलात तर, मराठीतील जी म्हण आहे, स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेणे ही आपल्याला लागू होईल. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम सांगते की या पुढच्या काळामध्ये विश्लेषणात्मक विचार, सक्रिय शिक्षण, जटिल समस्या सोडविणे, रचनात्मकता आणि गंभीर विचार करणे या गोष्टींवर भर दिला पाहिजे. हे वाणिज्य, कला, विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात लागू होते. यावर जर तुम्ही काम करत नसाल तर, तुमची पदवी चांगली असून सुद्धा पुढच्या पाच ते दहा वर्षात तुम्हाला नोकरी मिळणार नाही. या गोष्टी जर अमलात आणत असाल तर, तुमची पदवी ही कोणत्याही क्षेत्रातील का असेना तुम्हाला नोकरी नक्की मिळेल, असे भूषण केळकर म्हणाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही डॉक्टर केळकर यांनी समर्पक उत्तरे दिली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील म्हणाले की, आज ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात एआय आले आहे त्याप्रमाणे उद्योग क्षेत्रातही एआय आले आहे. त्यावर मात करणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्या आवडीचे काहीतरी शिकावे स्वतःमधील काहीतरी चांगले शोधावे आणि त्यात करिअर करावे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव आणि प्राध्यापक गिरीजा दीक्षित यांनी केले तर आभार प्राचार्य रोहिणी चव्हाण यांनी मानले. यावेळी एसपीएम मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरचा नदीम शेख महाराष्ट्र संघात

Next Post

प्रिसिजन कॅमशॉफ्टतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 25 आसनी बस भेट…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
प्रिसिजन कॅमशॉफ्टतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 25 आसनी बस भेट…

प्रिसिजन कॅमशॉफ्टतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 25 आसनी बस भेट…

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026