• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2025
in इतर घडामोडी
0
जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

शाश्वत भविष्यासाठी सोलापूरकरांनी केली सायकलिंग…



सोलापूर. दि. ३ : नियमित सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सायकल चालवल्याने वजन कमी होते, हृदय निरोगी राहते, स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. आरोग्यासोबतच सायकलिंगमुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो, ज्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे सरंक्षण होते म्हणून प्रत्येकाने सायकलिंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे, असे आवाहन सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केले. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी यादव बोलत होते.

            यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके, रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आणि कार्यालय सहायक जे एम हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

           शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग ही यावर्षीची जागतिक सायकल दिनाची संकल्पना आहे. सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव आणि पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांचे हस्ते सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या आवारातून हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली सुरु करण्यात आली. सोलापूर महापालिका, पार्क चौक, सरस्वती चौक,  शिवाजी महाराज चौक,  एकेरी वळण, नवी पेठेत प्रवेश, लकी चौक, हुतात्मा बागीचा रस्ता, पार्क चौक, डफरीन चौक वळण परत सोलापूर महापालिका आवर येथे समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात सायकल प्रेमींनी भारत माता की जय, वंदे मातरम, प्लास्टिक हटवा, कापडी पिशवी वापरा, प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा आदी घोषणा दिल्या.

          सायकलिंगच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २०१८ पासून दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकाकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. यामध्ये सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहन पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी केले.

         यावेळी उपस्थित सायकल प्रेमीना पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामध्ये पराग दोशी, सुबोध जंगे, सुरेश बालगावकर, श्रीधर वडनाल, राजकुमार बिंगी, अशोक बिराजदार, तुकाराम क्षीरसागर, सत्यनारायण दिकोंडा, गोवर्धन जोशी, अंजली शेंडगे, प्रेषिता चपळगावकर, विष्णू गोस्की, किरण भीमर्थी, शेखर वडी शेरला, संजय करवंदे, महेश कासार, प्रथमेश कुमठेकर, श्रीकांत मामुरे, दत्ता ढोणे अनंत चिटकूल, इरप्पा स्वामी, नितीन चपळगावकर, अंकिता भावठाणकर, तुकाराम कडमनची, चंद्रशेखर गायकवाड आदि सायकल प्रेमीनी भाग घेतले.
Previous Post

पाली भाषेत ज्ञानाचा व संशोधनाचा मोठा भांडार: कुलगुरू डॉ. महानवर…

Next Post

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू…

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू…

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू...

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026