येस न्यूज मराठीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रारंभी वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त रवी पवार, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, स्पेन्का वॉटर चे सुहास आदमाने या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी सुरवसे त्यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले आणि येस न्यूज मराठी च्या वाटचाली बद्दल माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी येस न्यूज मराठीच्या पत्रकारितेचे कौतुक करत सोलापूरचे तापमान कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन केले. तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी येस न्यूज मराठीला आपल्या मनोगत मधून शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, प्रिसिजन कॅमशाप्टचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एअरपोर्ट मॅनेजर सज्जन निचळ, एवरेस्ट कंपनीचे अशोक भोसले, गिरीश दर्बी, यश दर्बी, खुशाल कोल्हापुरी, नरेश पंचारिया, भाजपचे शहाजी पवार,अविनाश महागावकर, सिद्धेश्वर किनगी,शशी थोरात, हरिदास रणदिवे, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, शांतकुमार मोरे, प्रशांत बडवे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य शंकर नवले, चाटे कोचिंग क्लासेसचे सतीश काळे , कामतकर अकॅडमीचे सुनील कामतकर, ज्ञानेश्वर सपाटे, बळीराम जांभळे, संजय केशरे, शिवाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर शिवानंद जाधव यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आदरातिथ्य केले. राजकीय, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता शिक्षण, व्यापार अधिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून यावेळी शुभेच्छा दिल्या.









