• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात १४७ वी श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2025
in इतर घडामोडी
0
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात १४७ वी श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात साजरी.
0
SHARES
1
VIEWS

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.

   पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले, व नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे चेअरमन प्रथमेश महेश इंगळे यांचे हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज दिवसभरात मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे, अक्कलकोटचे न्यायाधीश मुकूल कल्याणकर आदींनी दर्शन घेतले. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले. 

    तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याची  समाप्ती  करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ५० भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली. पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख, भजनसेवा व धर्मसंकीर्तन सोहळा चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली पार पडले. यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे,

व्यंकटेश पुजारी, गणेश दिवाणजी, शिवशरण अचलेर, श्रीपाद दिवाणजी, सुहास पाटील, दर्शन घाटगे, दिपक गवळी, महेश मस्कले, नागनाथ गुंजले, शिवशरण इचगे, प्रशांत गुरव, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, मंगेश फुटाणे, श्रीमुख जगदाळे, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, संतोष देगावकर, स्वामीनाथ लोणारी, मल्लिनाथ बोधले, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी बाळासाहेब घाटगे, सागर गोंडाळ, दीपक जरीपटके, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, संजय बडवे, ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद किलजे यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.

Previous Post

बसवण्णांनी देवाला भक्तांच्या हातात दिला : गिरीश जाखोटिया

Next Post

सोलापूर महानगरपालिके कडून दूषित पाणी शोध मोहीम…

Related Posts

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिके कडून दूषित पाणी शोध मोहीम…

सोलापूर महानगरपालिके कडून दूषित पाणी शोध मोहीम...

ताज्या बातम्या

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026