मला शंका आहे की, कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत, सगळ्या टीम जाताहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही. त्यामुळे शंका व्यक्त करायला वाव आहे. परंतु त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे.”
“बीडचे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम पाठवल्या आहेत. महाराष्ट्रातील बाकीच्या टीमही त्याच्या मागावर आहेत. मग तपास न लागण्याचं कारण काय, हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की, त्याचा खून झाला की काय? अशी शंका मला आहे”, असे शिरसाट यांनी सांगितले.
यापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आली आहे. तो जिवंत नाहीये, असा दावा केलेला आहे. त्याचबरोबर सुरेश धस यांनीही त्यांच्या जिवंत असण्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही “कृष्णा आंधळे जिवंत नाहीये. त्याची हत्या झालेली आहे”, असा अधिवेशन सुरू झाल्यानंतर केला आहे.











