सोलापूर शहराला पंतप्रधान ई-बस योजनेतून 100 बसेस मंजूर झाल्या आहेत. यातील 20 बसेस येऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला. परंतु बुधवार पेठ बस डेपो या ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेले चार्जिंग स्टेशन, पूर्ण न झालेली सुरक्षा भिंत, अद्याप येथे न आलेले विद्युत कनेक्शन…यामुळे या नव्या बसेस रस्त्यावर येण्यासाठी आणखी एक ते दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुधवार पेठ डेपो येथे बस सुरक्षित राहणार नसल्यामुळे या सर्व बसेस दमाणीनगर येथे असलेल्या एक्झिबिशन ग्राउंड वर लावण्यात आल्या आहेत.अद्याप या बसेसचे आरटीओ कडून पासिंग झाले नाही.महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांसह बुधवार पेठ बस डेपोच्या कामांची पाहणी केली त्यांनी महिनाभरात या बसेस प्रवाशांच्या सेवेत सुरू होतील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सोलापूरकरांना या नव्या बस मधून फिरण्यासाठी किमान महिना- दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.









