• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2025
in इतर घडामोडी
0
‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा : संपादक राजीव खांडेकर

पंढरपूर- ‘आज जगात काय होत आहे ते लगेच सर्वांना समजते. तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे, मोबाईलमुळे जग कवेत आले आहे. अशा वेळी पत्रकारांना मात्र सक्रीय रहावे लागते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अफाट संधी निर्माण झाली आहे त्यामुळे चांगली कौशल्याची कामे करायची आपली तयारी हवी. जगभरात शेती आणि नर्सिंग यामध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. आज उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग आपण विधायक दृष्टीने करावा.’ असे प्रतिपादन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले.

पंढरपूर प्रेस क्लब आणि स्वेरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजिलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी संपादक राजीव खांडेकर हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. पत्रकारितेतील आद्यगुरु आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमा पूजन, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत, व स्वेरीच्या गीतानंतर स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी स्वागतपर भाषणात स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, मिळालेली मानांकने व राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांचे असलेले महत्व व त्यानी समाजाच्या हितासाठी दिलेले योगदान आज आपण वारंवार संदर्भासाठी घेऊन कसे वापरता येईल आणि पंढरपूर आणखी कसे समृद्ध करता येईल याचा परामर्श घेवून पत्रकारांसाठी आयोजिलेल्या या कार्यशाळेविषयी माहिती दिली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, ‘आज अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालायला हवी. केवळ नोकरीच्या मागे न लागता नेहमीच्या शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित करायला हवीत. आज पत्रकारितेचा उपयोग समाजासाठी होत असताना अनेक बदल होत आहेत. मातीमध्ये मिसळा, नैसर्गिक गोष्टीचा पुरेपूर वापर करा. खेड्यात, शेतात चांगले वातावरण मिळते. स्वच्छ ऑक्सिजन मिळतो. परंतु आज उपलब्ध असलेली ही संपत्ती आज धोक्यात आहे, ती वाचविण्याची गरज आहे.’ दुसऱ्या सत्रात ‘पत्रकारीते समोरील आव्हाने आणि समाजातील सर्व घटकांचा पत्रकारिता या लोकशाहीतील चौथ्या स्तंभाबाबतीत हवा असलेला सहभाग’ या विषयावर साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसट म्हणाले की, ‘दर्पण आणि दिग्दर्शन ह्या दोन गोष्टी पत्रकारीतेमधून डोकावत असतात. ‘दर्पण’ चांगले दाखविले तर ‘दिग्दर्शना’चे काम कमी होते. टिळक आणि आगरकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात जमीन आसमानचा बदल झाला असून आज ध्येयवाद कमी झाला असून त्यात पेशा वाद सुरु झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आल्यामुळे प्रिंट मिडीयाचा फायदाच झाला आहे. म्हणून समाज, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे.’ असे सांगून पत्रकारितेपुढील आव्हाने सांगितली.

यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षीय मनोगतात एबीपी माझाचे खांडेकर म्हणाले की ‘आपली पत्रकारिता ही आग ओकणारी आहे की विझवणारी याची जाणीव असावी. पत्रकारिता हे ध्येय, पेशा, व्यवसाय व धंदा असा बदल होत आहे.’ तिसऱ्या सत्रात ‘पंढरपूर व वारकरी संत साहित्य संदर्भातील पत्रकारांचे योगदान’ या विषयावर ‘रिंगण’चे संपादक सचिन परब म्हणाले की, पंढरीचे वैभव सर्वदूर पोचवायचे असेल तर संतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. संतांच्या विचारांची नव्या पद्धतीने पुन्हा मांडणी करावी लागणार आहे. साने गुरुजी, संत सोयराबाई धर्माची चिकित्सा, बसववचने,नाथ महाराजांच्या गाथा, अभंग यावर परब यांनी प्रकाश टाकून ए.आय. हे तंत्रज्ञान भविष्यात फायद्याचे की तोट्याचे यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक विजय चोरमारे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये वारकरी संप्रदायात कट्टरता जपणाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. यामुळे प्रवाह प्रदूषित होत असून चळवळ प्रदूषित करण्याचा हा प्रयत्न आहे. जादूटोणा विधेयक विधानसभेत मांडत असताना अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम डॉ. नरेंद्र दाभोळकर करीत होते. त्यांची हत्या झाली, त्याची जबाबदारी खरी तर वारकरी संप्रदाय व पत्रकारितेची आहे. आपल्याकडे एखादा मंत्री आला तर आपल्या भागातील विकासाचे प्रश्न विचारावे.’ सरकारला वेळोवेळी जागृत राहण्यासाठी पत्रकारांनी प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे.

यावेळी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतील प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडियातील जवळपास ३५० पत्रकार, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.

ग्लोबल वॉर्मिग मुळे पृथ्वी सध्या धोक्यात आहे. ही वाचविण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. जर आत्ताच झाडे नाही लावली नाहीत तर प्रवास करताना भविष्यात ऑक्सिजनची बाटली सोबत घ्यावी लागेल. या कार्यशाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञान व पत्रकारिता याची सांगड घालण्याचा प्रयत्न स्वेरीने यशस्वीपणे केला आहे.

  • डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पु.अ.हो.सो.वि.सोलापूर

क्षणचित्रे-
•पाहुण्यांची व पत्रकारांची भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वागत व आदर सन्मान त्यातील वेगळेपणा हे सर्व सुंदर व नेटके झाल्यामुळे पाहुणे विजय चोरमारे यांनी स्वेरीचे कौतुक केले.
•पंढरीच्या परंपरेला अनुसरून आलेल्या पाहुण्यांना पांडुरंग मूर्ती, टोपी, उपरणे आणि गाथा देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
•साधेपणा आणि रुचकर शाकाहारी भोजन पाहून पाहुणे व पत्रकार प्रसन्न झाले.
•पत्रकारांना नावनोंदणी पासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत कोणतीही अडचण आली नाही.

Previous Post

गुजरातमधील वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं…

Next Post

विद्यापीठातील ललितकला संकुलामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न!

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
विद्यापीठातील ललितकला संकुलामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न!

विद्यापीठातील ललितकला संकुलामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न!

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026