• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 10 जानेवारीला 20 वा दीक्षांत समारंभ!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2025
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 10 जानेवारीला 20 वा दीक्षांत समारंभ!
0
SHARES
1
VIEWS


राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार
15 हजार 219 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार!
71 संशोधकांना पीएच. डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, दि. 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रारंभी सकाळी साडेदहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. 

यावर्षी 71 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते.


अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राविषयी चित्रांचे प्रदर्शन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठामार्फत अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्र विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन यानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात एकूण 55 चित्रे ठेवण्यात येणार असून महाराष्ट्रातील मान्यवर चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांचा यात समावेश आहे.

Previous Post

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Next Post

मूकबधीर विद्यार्थ्यांनी साकारले, क्रांतिज्योती सावित्रीबाइंनचे कार्य

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
Next Post
मूकबधीर विद्यार्थ्यांनी साकारले, क्रांतिज्योती सावित्रीबाइंनचे कार्य

मूकबधीर विद्यार्थ्यांनी साकारले, क्रांतिज्योती सावित्रीबाइंनचे कार्य

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026