• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राम सर्वांचे आहेत; शतकानुशतके केलेली प्रतीक्षा आज संपली : पंतप्रधान मोदी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2020
in मुख्य बातमी
0
राम सर्वांचे आहेत; शतकानुशतके केलेली प्रतीक्षा आज संपली : पंतप्रधान मोदी
0
SHARES
0
VIEWS

अयोध्या : अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित केले. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, येथे येणे स्वाभाविक होते. कारण राम काज कीजे बिना मोहि कहां विश्राम. भारत आज भगवान भास्करच्या सानिध्यात शरयू किनारी एक सुवर्ण अध्याय रचत आहे. सोमनाथ पासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयापासून सारनाथपर्यंत, अमृतसरपासून पाटणा साहिबपर्यंत, लक्षद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आहे.

  • काय म्हणाले मोदी

◆ राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला.

◆ इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंगांचे किंवा राम कथांचे वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितले जाते. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देशात राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.

◆ तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचे नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात.

◆ जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे.

◆ श्रीरामांचे व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत.

◆ ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी महात्मा गांधींना सहयोग केला, तसेच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरु झाले आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे.

◆ कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.

◆ हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली. हे मंदिर आपले आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचं दर्शन करायला येतील.

◆ राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पण आणि तर्पणही होता, संघर्षही होता आणि संकल्पही होता. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने नमन करतो. यात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती हा सोहळा पाहत आहे.

◆ राम आपल्या मनात एकरुप झाले आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणेसाठी आपण भगवान रामाकडेच पाहतो. इमारती नष्ट झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. अनेक शतके तंबूत राहिलेल्या रामलल्लांसाठी एक भव्य मंदिर बांधले जात आहे.

◆ रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपले सर्वस्व अर्पण केले होते. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नाही असे एकही ठिकाण नव्हते. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानांचे प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतके, अनेक पिढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचे प्रतिक आहे.

Previous Post

भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी..

Next Post

राखीपौर्णीमानिमित्त मार्कंडेय रूग्णालयातील कोवीड योद्धांचा सन्मान

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
राखीपौर्णीमानिमित्त मार्कंडेय रूग्णालयातील कोवीड योद्धांचा सन्मान

राखीपौर्णीमानिमित्त मार्कंडेय रूग्णालयातील कोवीड योद्धांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026