• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्व शासकीय यंत्रणांनी आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2024
in मुख्य बातमी
0
सर्व शासकीय यंत्रणांनी आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या क्षणापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत सतर्क राहून करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय इमारत, कार्यालय त्या ठिकाणी राजकीय व्यक्तींचे छायाचित्रे, नावे असतील तर ते तात्काळ झाकून ठेवण्याची कार्यवाही करावी अथवा काढून टाकावे. संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व्यक्तींचे पोस्टर्स बॅनर्स व अन्य राजकीय मजकूर असेल तर तोही काढून टाकावा व त्याचा अहवाल 24 तासात जिल्हा प्रशासनाला सादर करावा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्याकडे असलेली पदाधिकारी यांची वाहने तात्काळ निवडणूक प्रशासनाकडे जमा करावीत. आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत काटेकोरपणे होईल याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

ज्या कामांचे टेंडर प्रक्रिया झालेली आहे परंतु कामे सुरू झालेली नाहीत अशी कामे अजिबात सुरू करू नयेत. तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांचे टेंडर नोटीस चे रजिस्टर लाल शाहीने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी मार्क करून त्याची माहिती प्रशासनाला सादर करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आचार संहितेच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल प्रशासनाला त्वरित सादर करावा. आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे अशी कोणाचीही तक्रार येण्यापर्वी
अत्यंत दक्ष राहून सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले.

यावेळी पोलीस आयुक्त एम. राज, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही आचारसंहितेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी श्रीमती कुंभार यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शासकीय विभाग प्रमुखांनी करावयाची कार्यवाही तसेच घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावर 24 तास सुरू राहणार नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाल्याची माहिती दिली.

Previous Post

प्रभाग 26 मधील विष्णुपुरी येथे पाण्याची पाईपलाईन कामाचे उद्घाटन

Next Post

पोर्णिमा हा दिवस देवीचाच का? कोजागिरीला सर्वात मोठे स्थान का?

Related Posts

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
Next Post
पोर्णिमा हा दिवस देवीचाच का? कोजागिरीला सर्वात मोठे स्थान का?

पोर्णिमा हा दिवस देवीचाच का? कोजागिरीला सर्वात मोठे स्थान का?

ताज्या बातम्या

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

June 25, 2026
राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026