• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे सुपुत्र अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपती पदक जाहिर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे सुपुत्र अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपती पदक जाहिर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,(प्रतिनिधी)ः- सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील पोलीस आणि संरक्षण दलातील विविध विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या गुणवत्ता आणि शौर्य तसेच विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले.

कर्तव्य बजावत असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक देवून सन्मान करण्याची परंपरा राष्ट्रपती भवनाकडून कायम करण्यात आली. यंदाच्या या राष्ट्रपती पदकावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे सुपुत्र दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांचे नाव कोरले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत असलेले दत्तात्रय शिंदे हे सन 1996 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून उत्तीर्ण होवून राज्याच्या पोलीस दलात सहभागी झाले.

नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी गडचिरोली येथे पोलीस अधिक्षक म्हणून परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला त्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी गोंदिया येथे सेवा बजावली. सन 2001 मध्ये त्यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या धाडसी कामगिरीची चुणुक दाखवली. सन 2002 मध्ये सोलापूर शहरात उसळलेल्या जातीय दंगलीत त्यांनी अत्यंत कर्तव्य कठोरपणे काम करून जातीय दंगल शांत करीत कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवली. रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत अनेक गुन्हेगारांवर वचक ठेवून मोठ्याप्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवले आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला तसेच हातबॉम्बही जप्त करून मोठी कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.

सोलापूर शहरातील त्यांच्या या धाडसी सेवेबद्दल सोलापूरकरांनी त्यांचा मोठा सन्मानही केला. त्यानंतर नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली नंतर फोर्स वन चे पोलीस अधिक्षक, त्यानंतर सिंधुदुर्ग, सांगली येथे पोलीस अधिक्षक म्हणूनही त्यांनी कामगिरी पार पाडली. राज्य राखीव दल क्र.4 नागपूरचे समादेशक नंतर जळगांवचे पोलीस अधिक्षक त्यानंतर महावितरणचे कार्यकारी संचालक, नंतर पालघरचे पोलीस अधिक्षक असा प्रवास करीत ठाणे शहरातील कल्याण मध्ये अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत सध्या ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत.

त्यांच्या या सेवा कार्यकाळात त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक,आंतरीक सुरक्षा पदक अशी महत्वाचे आणि मोलाचे पदक मिळाले तसेच त्यांनी पोटा, टाडा, मोक्का,एमपीडीए अशा विशेष कायद्यान्वये दाखल असलेल्या महत्वाच्या गुन्ह्याचा तपासही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.त्यांच्या या विशेष कामगिरीची राष्ट्रपतीकडून दखल घेवून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना विशेष गुणवत्तापूर्ण सेवा राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पदकाबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरीकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

Previous Post

विविध मागण्यांबाबत आमदार देशमुखांनी घेतली आयुक्ताची भेट

Next Post

प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026