• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजर्षी शाहू महाराजांची १५०वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2024
in इतर घडामोडी
0
राजर्षी शाहू महाराजांची १५०वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: सामाजिक क्रांतीचे प्रणेते असणारे राजर्षी शाहू महाराज यांची २६ जुन २०२४ रोजी १५० वी जयंती आहे.भूतपूर्व कोल्हापूर राज्याचे अधिपती असणारे शाहू छत्रपती महाराज यांनी शोषित व वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या राज्यात १९०२ साली आरक्षणाची योजना राबवली. त्यांनीच भारतात सर्वप्रथम बहुजन समजाला शिक्षण व नोकरीमध्ये ५०% आरक्षण दिले. अस्पृश्यता निवारणाचे कायदे करून सामाजिक परिवर्तन घडविणारे ते राजे होते.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत कला, क्रीडा, संस्कृती, उद्योग, शेती, प्रशासन या सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणले. संगीत, नाट्य, चित्रकला व मल्लविद्येस त्यांनी विशेषत्वाने प्रोत्साहन दिले. त्यानीच महाराष्ट्रात सहकार चळवळीचा पाया रोवला. उद्योग व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. शेतकऱ्यांना स्वतःची व्यापारपेठ उपलब्ध करून दिली. त्यांनी आपल्या राज्यात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी अनेक योजना राबविल्या. आपल्या प्रजेला सुशिक्षित करून त्यांना प्रशासकीय निर्णय घेण्यास सक्षम बनवणे व तद्नंतर लोकशाही प्रदान करणे, हे त्यांच्या राज्यशैलीचे मुख्य उद्दिष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांनी उच्चशिक्षणासाठी विनाअट मदत केली होती. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात मी महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगाव दलित परिषदेतूनच केली, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. १९२० साली कोल्हापूर राज्यातील माणगाव येथे झालेल्या याच परिषदेत महाराजांनी बहुजनांचे नेतृत्व हे डॉ. आंबेडकर करतील व पुढे जाऊन एक वेळ अशी येईल की ते संपूर्ण भारताचे पुढारी होतील, असे सूतोवाच केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांना The Pillar of Social Democracy म्हणून संबोधले आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची कारकीर्द ही तत्कालीन प्रजेसाठी तर सुख:प्रद होतीच मात्र त्यांची राज्यपद्धती ही आजदेखील आदर्शवत आहे. एक राज्यकर्ता कसा असावा, प्रशासन कसे चालवावे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू छत्रपति महाराज आहेत ! महाराजांच्या राज्याभिषेकाच्या शताब्दीचे औचित्य साधून १९७४ साली भारत सरकारने त्याचे पोस्ट कार्ड प्रकाशित केले होते. लोकशाहीचे सर्वोच्च सभागृह असलेल्या या संसद भवनाच्या प्रांगणात लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या या महान राजाचा पूर्णाकृती पुतळा देखील आहे. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल साहित्य फारसे प्रकाशित झाले नाही.

राजा असूनही एका ऋषी प्रमाणे आयुष्य जगलेल्या प्रजाहितवत्सल राजर्षी शाहू महाराजांची १५० वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून प्रयत्न व्हावेत. राज्य सरकारने शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त एक विशेष समिती बनवून वर्षभर विविध उपक्रम राबवावेत जेणेकरून शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचतील.
या मागणीचे निवेदन मा.आशुतोष तोंडसे जिल्हाप्रमुख स्वराज्य पक्ष विद्यार्थी आघाडी यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य पक्ष सोलापूरच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी वकील आघाडीचे शहर प्रमुख अँड.गणेश कदम, युवक शहर प्रमुख एजाज हुंडेकरी, फयाज पटेल, मुस्ताक शेख, इम्रान शेख यांच्यासह स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

●प्रतिक्रिया●
२६ जुन २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५० वी जयंती आहे त्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारला शाहू महाराजांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. शासन दरबारी जयंतीच्या निमित्ताने कोणतीही बैठक किंवा पूर्वतयारी दिसत नाही.
राज्य सरकारने शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २०२४-२५ हे वर्ष “सामाजिक न्याय वर्ष” म्हणून जाहीर करावे व एक विशेष समिती बनवून शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.
राजर्षी शाहू महाराजांची १५० वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून प्रयत्न व्हावेत.
तसेच जसे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे स्मारक उभारण्यात आले त्याच धर्तीवर शाहू महाराजांना १९०२ साली केंब्रिज विद्यापीठाने एल. एल. डी ही पदवी दिली त्या केंब्रिज विद्यापीठात राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावे.

Tags: 150th birth anniversaryRajarshi Shahu Maharaj
Previous Post

कासेगावात पुरात वाहून गेले तिघेजण

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा

खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026